
मंचर : “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. फक्त झाडं लावणं पुरेसं नाही, ती जगवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. वृक्षामुळे निसर्ग साखळी जपली जाते, हवामानात समतोल राहतो व प्रदूषणावर नियंत्रण मिळते. त्यासाठी गावोगावी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे.” असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.