esakal | अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये वृक्षारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

sayaji.jpg

पडवी व देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथे आज सकाळी सव्वा नऊ वाजता अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत अडीच हजार झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये वृक्षारोपण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केडगाव  : पडवी व देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथे आज सकाळी सव्वा नऊ वाजता अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत अडीच हजार झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पडवी ग्रामपंचायत, एक मित्र एक वृक्ष परिवार, देऊळगाव गाडा ग्रामपंचायत, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यानिमित्त परिसरातील शालेय विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ यांनी वृक्षारोपणासाठी मोठे सहकार्य केले आहे.

पडवे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शितोळे म्हणाले, की पडवी गावातील लोकसंख्या इतकी चार हजार  झाडे या माळरानावर या अगोदर लावली आहेत. याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ढोल लेझीम गजरात उत्स्फूर्त  स्वागत केले.

आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षदिंडी काढण्यात आली होती. झाडे लावा झाडे जगवा या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी माजी आमदार रंजना कुल, एक मित्र एक वृक्ष चे प्रशांत मुथा, नामदेव बारवकर, सरपंच राजेंद्र शितोळे,  डी. डी. बारवकर, सरपंच पुनम विधाते, जयश्री दिवेकर, वनविभागाचे उपनिरीक्षक सय्यद होते.

loading image
go to top