फलटण
फलटणला वृक्षारोपणाने स्मृतींना उजाळा
फलटण, ता. ३ : तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी फलटण लायन्स क्लब, माळजाई उद्यान विकास समिती आणि फलटण शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
येथील माळजाई उद्यानात माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, अनंत ऊर्फ बबनराव क्षीरसागर, वसंतराव पेटकर, वर्धमान शहा, दत्तोपंत देशपांडे, शाहू थोरात, राजाराम देशपांडे, वसंतराव ढवळीकर, दिगंबर देशपांडे, सुभाषराव निंबाळकर, व्यंकटेश तथा बापू देशपांडे, सुधीर उंडे, दिलीपराव रुद्रभटे, प्रा. रमेश आढाव, दिलीप देशपांडे, विलास साळुंखे, सुरेश गायकवाड, आर. के. निंबाळकर, राजेंद्र भागवत, भालचंद्र देशपांडे, ॲड. दस्तगीर मेटकरी, रामविलास रणसिंग आणि चंद्रकांत साळवी आदींच्या स्मरणात वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी अरविंद मेहता, माळजाई उद्यान विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, माजी लायन्स प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, सुभाष भांबुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमोद निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आर्किटेक्ट स्वीकार मेहता यांनी केले. या वेळी लायन्सचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.
01965
फलटण ः येथे वृक्षारोपण करताना पत्रकार व लायन्स क्लबचे पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

