'कपिला'च्या प्रेमापोटी मालकाने केले असे की, सर्वांनाचा वाटेल हेवा

गजेंद्र बडे 
Wednesday, 16 September 2020

कपिला गाईवर मालकाचे नितांत प्रेम होते. त्या प्रेमापोटीच या मालकाने आपल्या गाईच्या पहिल्या स्मृतिदिनी चक्क स्मृतीवृक्ष म्हणून आंब्याच्या झाडाची लागवड करत तिच्या स्मृती जतन केल्या आहेत. 

पुणे : कपिला म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते स्त्रीचे रूप. मग ही स्त्री म्हणजे आई, पत्नी किवा मुलगी यापैकीच एक असणार, असाही आपला समज होऊ शकतो. पण हा समज सपशेल खोटा ठरणारा आहे. कपिला ही स्त्री नसून एक दुभती गाय आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गाईवर मालकाचे नितांत प्रेम होते. त्या प्रेमापोटीच या मालकाने आपल्या गाईच्या पहिल्या स्मृतिदिनी चक्क स्मृतीवृक्ष म्हणून आंब्याच्या झाडाची लागवड करत तिच्या स्मृती जतन केल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील वनग्राम असलेल्या रानमळा (ता. खेड) येथील ही घटना आहे. या गाईचा गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. कैलास हरिभाऊ वाघोले असे या गोमाताप्रेमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते वारकरी संप्रदायातील आहेत. 

बळीराजा अशी ओळख निर्माण केलेल्या शेतकऱ्यांचा बैल, गाय  आदी मुक्या प्राण्यांवर फारच जीव जडलेला असतो. तेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पशूधन हे जणू शेतकरी कुटूंबाचे सदस्यच असतात. त्यातूनच या मुक्या प्राण्यांना ते जीवापाड जपत असतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कैलास वाघोले यांच्याकडे 'मोरी ' (कपिला) नावाची एक दुभती गाय  होती. या गाईमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला. मालकाला पण ही  आर्थिकदृष्टया सक्षम करत असतानाच तीचा मृत्यू झाला. गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष पी. टी. शिंदे यांनी त्यांना केशर आंब्याचे रोप उपलब्ध करून दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गावात गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी वृक्ष लागवड करण्यात येते. त्यामुळे वृक्ष लागवडीचा हा 'रानमळा पॅटर्न 'च झाला आहे. पण आता व्यक्तीप्रमाणेच  गोमाता-स्मृतीवृक्ष लावण्याची नवीन संकल्पना या गावाने सुरु केली असल्याचे पी. टी. शिंदे यांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tree planted by a farmer