dilip walse patil
dilip walse patil

नैसगिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज : दिलीप वळसे पाटील

मंचर : लोकसंख्या व शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. पण त्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली नाही. वाढते तापमान, हवेचे प्रदुषण, कोरोनाच्या संकटात कृत्रिम ऑक्सिजन समस्येला तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर नैसगिक ऑक्सिजन निर्मितीसाठी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने १० एकर खडकाळ माळरान जमीन विकसित केली. तेथे केशर आंब्यासह फळझाडांची लागवड उपक्रम हाती घेतला. वृक्ष संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव)- येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या आवारात ज्ञानशक्ती संस्था व महाविद्यालयाच्या वतीने ५ एकर जमिनीत केशर आंबा लागवडीचा शुभारंभ वळसे पाटील यांच्या हस्ते रविवारी( ता.30 मे) झाला. याप्रसंगी पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, भरत टेमकर, युवराज बाणखेले, डॉ. सुदाम खिलारी, बाळासाहेब भेके, यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

dilip walse patil
आंबेगाव तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील  

प्राचार्य के. जी. कानडे म्हणाले, “महाविद्यालयातील दीड किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा विविध १७ प्रकारच्या दोनशे वृक्षाची लागवड केली जाणार आहे. एकूण दोन हजार वृक्ष लागवडीचा हा प्रकल्प आहे. पक्षी संवर्धन व कृषी पर्यटनाला चालना दिली जाईल. निसर्ग पर्यावरण अभ्यासकांना परिसर वरदान ठरेल.” “दोन ते तीन विद्यार्थ्यांना एका वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी दिली जाईल. प्रत्येक लागवड केलेल्या वृक्षाची उंची व व्यास याचे मोजमाप करून नोंदणी करून पुढील वर्षी मूल्यमापन होईल. दरवर्षी वृक्षाचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयामार्फत रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक दिले जाईल.” असे ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी विशाल काळे यांनी सांगितले.

dilip walse patil
आंबेगाव तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील  

“ १५ ते 20 वर्षापूर्वी ‘हवा विकत घ्यावी लागेल’ अशी भाषणे दशक्रिया विधीत ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे अध्यक्ष डी.के.वळसे पाटील करत होते. त्यावेळी आमच्यासह लोक हसत होते. हवा कुठे विकत घ्यावी लागेल का ? असे लोक चर्चा करत होते. पण कोरोनामुळे कृत्रिम ऑक्सिजन मिळविण्यासाठी करावी लागणारी धावपळ सर्वांनी अनुभवली आहे. डी के वळसे पाटील याचे भाकीत खरे ठरले आहे. त्यानी सुरु केलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमाची जनजागृती करू”, असे राजाराम बाणखेले व बाळासाहेब बाणखेले यांनी सांगितले. यावेळी उद्योजक तानाजी राजगुडे, यांनी ५० केशर आंबा रोपे व अकरा हजार रुपयांचा धनादेश महाविद्यालयाला दिला. आंबा लागवड प्रकल्पाचे प्रमुख समन्वय प्रा. कैलास एरंडे, अधीक्षक प्रभाकर पारधी, संतोष शेटे, प्राध्यापक व कर्मचारयाची व्यवस्था पाहिली.

dilip walse patil
मंचर : खुनाला वाचा फुटली, लग्न होण्याऐवजी आरोपींची वरात पोलिस ठाण्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com