

PNE26W49464
सोलापूर : वृक्षारोपणप्रसंगी निमा व हरित धारा ग्रुपचे पदाधिकारी.
---
निमा, हरित धारा ग्रुपचा
‘एक रविवार गावासाठी’
बीबीदारफळ येथे १२५ रोपांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : निमा संघटना आणि हरित धारा ग्रुपच्या वतीने बीबीदारफळ येथील गाव तलाव परिसरात १२५ रोपांची ट्री-गार्डसह लागवड करण्यात आली. ‘एक रविवार गावासाठी’ या उपक्रमांतर्गत तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामालाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.
तलावाच्या काठावर देशी, औषधी आणि शोभीवंत झाडांची लागवड करण्यात आली. तलाव परिसर हिरवाईने नटविण्यासोबतच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबत पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.
निमा संघटनेच्या वतीने गतवर्षी उळे, शेळगी आणि बोरामणी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली होती. यंदा सुमारे ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याअंतर्गत १२५ रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी निमा सदस्यांनी बीबीदारफळ येथील युवकांकडून राबविण्यात येणाऱ्या विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, सोलापूर अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, निमा वूमन फोरमच्या अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. रवी गायकवाड, डॉ. अभिजित पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्या सुनीता बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश साठे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन शिंदे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.