

Students Injured After Bee Attack While Trekking in Madheghat
esakal
-मनोज कुंभार
वेल्हे,(पुणे): पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केळद ग्रामपंचायत (ता.राजगड) हद्दीत मढेघाट परिसरात पुण्यातील एका साहसी ट्रेकिंगचे क्लासकडून आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकिंग दरम्यान विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळांच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. बहुतांशी विद्यार्थी हे 14 ते 17 वयोगटातील आहेत. यामध्ये ट्रेकर प्रशिक्षकांचा सुद्धा सहभाग आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.