यंदा दिवाळीत खण साडीचा ‘ट्रेंड; ऑनलाइन मार्केटमध्ये मोठी मागणी

khan-saree-trend
khan-saree-trend

पुणे - एकेकाळी चार दुकानांत जाऊन साडीचा पोत, रंग निरखूनच खरेदी केली जात असे. मात्र, कोरोनामुळे हीच खरेदी ऑनलाइन होतेय... ज्यामध्ये खण साडीला सर्वाधिक मागणी आहे. 

हातमागावर विणला जाणारा महाराष्ट्रातील पारंपरिक कापडाचा प्रकार असलेला खण तसा काहीसा दुर्लक्षितच प्रकार होता. चोळी किंवा फारतर परकर- पोलकं यामध्येच खणाचा वापर पाहायला मिळत असे. पण काही वर्षापूर्वी मराठी अभिनेत्रींनी डिझायनर खण साडीचा ब्रॅंड काढला आणि त्याला ग्लॅमर मिळालं. मात्र सणावाराला खणसाडीची खरेदी तितकीशी केली जात नव्हती. मात्र यंदा खण साडीमधील विविध प्रकार बाजारात आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरवातीला बाजारात केवळ पारंपरिक पद्धतीच्या आणि प्लेन खण साडी उपलब्ध होत्या. आता त्यामध्ये नथ, सरस्वती, कमळ, चंद्रकोर याची एम्ब्रॉयडरी असलेले नवनवीन डिझाईन्स आले आहेत, ज्यांना मागणी आहे. खण साड्यांची किंमत १२०० ते ५००० रुपयांपर्यंत आहे. ज्यामध्येही प्युअर खण, पॉलिस्टर मिक्‍स असे प्रकार पाहायला मिळतात. ज्यातील प्लेन हातमागावरच्या खण साड्यांना अधिक मागणी आहे

पारंपरिक खण हे रेशीम आणि सुतापासून बनवलं जाते. ज्यामुळे खण हे दिसायला इतर कापडांपेक्षा अत्यंत साधं असतं. मात्र सध्याच्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांमध्ये गरजेप्रमाणे पॉलिस्टरचाही वापर केला जातो. ज्यामुळे या साड्यांमध्ये ग्लेझ दिसून येते, जी हातमागावर विणल्या जाणाऱ्या साडीमध्ये नसते. परंतु ओरिजनल खण साडीच्या तुलनेत किंमत कमी आणि व्हरायटी जास्त असल्यानं महिलांचा कल या साड्यांकडे दिसून येत असल्याचं साडी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यामुळे प्युअर हॅण्डलूममधील प्लेन खण साडीही महिलांमध्ये लोकप्रिय होत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.

नवीन आलेल्या खण साड्यांमध्ये पारंपरिकता आणि आधुनिक ट्रेंडचा मिलाफ पाहायला मिळतो. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा सणाला ही साडी सूट होऊ शकते. म्हणूनच यंदा दिवाळीसाठी खणसाडीच घ्यायची असं ठरवलं होतं. ऑनलाइन मार्केटमध्येही या साडीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्यानं खरेदी करणं सोप झालं.
- मुक्ता मोरे, गृहिणी

आपल्याकडे पारंपरिक हातमागावरच्या साड्यांची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. फक्त काळानुसार त्यामध्ये बदल होतो. खणसाडी जरी पारंपरिक असली तरी सध्या काळाप्रमाणे त्याच्या डिझाईन्स आणि सुतामध्ये बदल झालेले आहेत. हे डिझाईन्स हटके आणि ट्रेंडी असल्याने तरुणींच्याही पसंतीस पडत आहेत.
- वृषाली सुर्वे, साडी विक्रेत्या

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता साडी खरेदी ऑनलाइन करण्याकडे महिला वळत आहेत. त्यातच नवीन आलेल्या डिझाईन्समुळे ऑनलाइन मार्केटमध्ये खण साडीचीच चलती आहे.
- दीप्ती शहापुरे, साडी विक्रेत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com