"आरएसएस’पेक्षा आदिवासी संस्कृती "श्रेष्ठ''

"आरएसएस’पेक्षा आदिवासी संस्कृती "श्रेष्ठ''
Published on

फोटो : H26460,61,62आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ.
...
संघापेक्षा आदिवासी संस्कृती श्रेष्ठ!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.९ : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमधे आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा नवीन वक्तव्य केले आहे. ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (आरएसएस) आदिवासी संस्कृती श्रेष्ठ असून आपण या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. सृष्टीतील पंचमहाभुतांना देव मानणाऱ्या या संस्कृतीचा विकास व्हायला हवा,’’ असे आवाहन त्यांनी आदिवासी बांधवांना केले.

अखिल भारतीय विकास परिषदेने शहरातील इदगाह मैदानावर आदिवासी दिनाचे आयोजन केले. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ उपस्थित होते. ते म्हणाले, की जल, जंगल आणि जमिन यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागेल. सत्ताधारी हे आदिवासींचे हक्क हिरावून घेत आहे. यापूर्वी आदिवासी बांधवांची जमीन थेट खरेदी करता येत नव्हती. पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियमात बदल करून ९९ वर्षांच्या कराराने घेता येईल, असा बदल केला. आदिवासींना लुटणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले. येणारा काळ हा कठिण असून त्यासाठी आदिवासींना संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. विकास म्हणजे केवळ रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, पैसा कमविणे नसून आपल्या संस्कृतिचे संवर्धन करणे म्हणजे विकास असल्याचे त्यांनी सांगितले. पंचमहाभुतांना देव मानणाऱ्या आदिवासींची संस्कृती ‘आरएसएस’पेक्षा श्रेष्ठ असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे.

नाशिकमधील खड्ड्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वातावरण गरम झालेले असताना काँग्रेसने आता यात उडी घेतली आहे. शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत २५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्याला सत्ताधारी जबाबदार असल्याची टीका सपकाळ यांनी केली. या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com