

Sunetra Pawar addresses a press conference in Baramati, announcing the Janajatiya Gaurav Seva Week from November 11 to 18 to extend government welfare schemes to tribal communities.
esakal
बारामती : भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत केले.