Tribute Paid to Brave Martyrs Who Sacrificed Their Lives in the Line of Duty
sakal
पुणे - देशांतर्गत सुरक्षितता आणि नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर हुतात्म्यांना बुधवारी (ता. २१) पाषाण येथील स्मृतिस्थळावर भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शोक कवायतीत, मागील एका वर्षात वीरगती प्राप्त झालेल्या देशभरातील १९१ पोलिस अधिकारी आणि जवानांच्या बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.