
कात्रज : कात्रज कोंढवा परिसरातील साळवे गार्डन (कौस्तुभ गणबोटे चौक) ते आंबा माता मंदिर या मार्गावर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भाग घेणाऱ्या वीर भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या मनोबलासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षातर्फे ही यात्रा काढण्यात आली.