कवडीमोल मोबदल्याविरोधात शेतकऱ्यांचा ज्वालामुखी

कवडीमोल मोबदल्याविरोधात शेतकऱ्यांचा ज्वालामुखी

Published on

NSK26H12695, NSK26H12696
त्र्यंबकेश्वर : येथे आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार खोसकर, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी राहुल पाटील, पुरुषोत्तम कडलग. दुसऱ्या छायाचित्रात आत्मदहनासाठी रचलेले सरण.

कवडीमोल मोबदल्याविरोधात

संतप्त शेतकऱ्यांचे
त्र्यंबकेश्वरला आंदोलन

कवडीमोल मोबदल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. २० : कुंभमेळा कालावधीसाठी उभारण्यात येणाऱ्या पर्यायी स्नानव्यवस्थेच्या कामांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. गोदावरीवर नवे घाट, दोन तीर्थकुंडे आणि हरित रस्ता उभारण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित केल्या जात आहेत. मात्र, बाजारभाव २५ ते ४२ लाख रुपये प्रति गुंठा असताना शासनाने केवळ २४ हजार रुपये प्रतिगुंठा दर मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या ‘कवडीमोल’ मोबदल्याविरोधात शनिवारी (ता. २१) आत्मदहनाचा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी सरण रचले.

दुपारी दोनच्या सुमारास आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यांच्या चर्चेनंतर आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला असला, तरी रचलेले सरण हटवण्यास शेतकऱ्यांनी ठाम नकार दिला आहे. ‘लेखी हमी आणि योग्य दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,’ असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. आमदार खोसकर यांनी तहसीलदार गणेश जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आणि अभियंता काकड यांच्याशी चर्चा केली. पालिकेने संबंधित जागांना अधिकृत मंजुरी नसल्याचे सांगितले; मात्र ज्या शेतीवर ‘प्लॉट’ पाडले आहेत, त्या प्लॉटधारकांच्या राखीव मोकळ्या जागांवर तातडीने बांधकामे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ‘आमच्या डोळ्यादेखत नुकसान सुरू आहे; म्हणूनच आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला,’ असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘पाच लाख प्रति गुंठा द्या’
शेतकरी जागा देण्यास तत्त्वतः तयार असल्याचे सांगत आहेत; मात्र किमान पाच लाख रुपये प्रति गुंठा दर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा बळजबरी झाल्यास आत्मदहन करू, असा इशारा शेतकरी आणि बडा उदासीन आखाड्याचे महंत दानमुनी तसेच महानिर्वाण आखाड्याचे महंत अजय पुरी यांनी दिला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते आणि त्यांच्या समोरच उभी असलेली भलीमोठी चिता प्रशासनासाठी स्पष्ट इशारा ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com