करंदी येथे ‘ट्रिनिटी’च्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
नसरापूर, ता. २५ ः ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय कोंढवा पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर भोर तालुक्यातील करंदी-खेडेबारे येथे पार पडले. सात दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावामध्ये स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य व शिक्षण या विषयी उपक्रमांचे आयोजन केले.
शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच नवनाथ गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सदस्य रणजीत बोरगे, माजी उपसरपंच प्रयाग गोळे, प्रगतशील शेतकरी निवृत्ती बोरगे, स्वप्निल बोरगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान ‘समाजाच्या जडणघडणीत युवकांचा सहभाग’ या विषयावर महादेव स्वामी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता फेरी काढून स्वच्छता अभियान राबविले. तसेच गावातील पुरातन महादेव मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. एम. ए. रंगूनवाला दंतवैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित दंत आरोग्य शिबिरात १०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालया तर्फे नेत्रतपासणी व महिलांच्या आरोग्य समस्यांवरील मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले. सुमारे ७० जणांची तपासणी करून मोतीबिंदूग्रस्त रुग्णांचे निदान करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील काळात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
समारोपापूर्वी गावातील बालकांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. शिबिराचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज जगताप, माजी सरपंच अलका तळेकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश बोरगे, निवृत्त सैनिक नारायण बोरगे तसेच महाविद्यालयातील संतोष लिम्हण उपस्थित होते.
शिबिरास महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक प्रा. प्रतीक अकर्ते, डॉ. गणेश कुतळ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शरद भोसले, प्रा. मनोज खराडे, प्रा. प्रसाद भोसले यांनी भेट देऊन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेश धुळे, सहकार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बडदे आणि गणेश आखाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

