

शेंझेन (चीन), ता. १८ (पीटीआय) : आपल्या चीन दौऱ्यात अमेरिकेची तांत्रिक क्षमता आणि जगावरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची पूर्ण तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र, मागील चार ते पाच दिवसांत अमेरिकेत विविध सरकारी आणि खासगी यंत्रणांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अडचणी निर्माण झाल्याचे घटनांमुळे ट्रम्प यांच्या नियोजनावर पाणी पडल्याचे चित्र आहे.
मागील चार ते पाच दिवसांत अमेरिकेत हवाई वाहतूक व नियंत्रण यंत्रणा, बँकिंग यंत्रणा, मायक्रोसॉफ्ट, युनायटेड एअरलाइन्स या कंपन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन त्यांच्या सेवा ठप्प पडल्या होत्या. काही काळानंतर त्रुटी दूर होऊन त्या सुरूही झाल्या. मात्र, आजही ‘ॲपल’च्या सेवांमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ट्रम्प यांनी अमेरिकेतील या तांत्रिक समस्यांकडे दुर्लक्ष केले होते. अमेरिकेतील नागरिक या अडचणींमुळे हैराण झाले असताना ट्रम्प यांनी मात्र फिलिपिन्समधील परिषदेत ‘सर्व काही ठीक आहे’, असे विधान केले होते. मात्र, तांत्रिक बिघाडांमुळे विविध सेवांमध्ये निर्माण झालेल्या व्यत्ययाचे सावट त्यांच्या चीनदौऱ्यावरही पडले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) दैनंदिन जीवनात व्यत्यय आणू शकते, ही भीती या घटनांमुळे अधोरेखित झाल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांच्या वतीने देशवासियांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या तांत्रिक बिघाडांचा एकमेकांशी संबंध असल्याचे किंवा यामध्ये प्रतिस्पर्धी देश, सायबर हॅकर किंवा गुन्हेगारांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.