पुण्यात भिक्षेकऱ्य़ाला डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

डेक्कन नदीपात्रामध्ये झोपलेल्या एका व्यक्तिच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

पुणे : डेक्कन नदीपात्रामध्ये झोपलेल्या एका व्यक्तिच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी व्यक्ती भिक्षेकरी असून त्याच्यावर ससून रुग्णलयात उपचार सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जॉन असे जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. जॉन हा भिक्षेकरी आहे. डेक्कन परीसरामध्ये तो भिक्षा मागत असतो. तर रात्री डेक्कन परीसरातील संभाजी पुलाखालील मोकळ्या जागेत झोपत असतो. बुधवारी रात्री जॉन नेहमीप्रमाणे पुलाखाली झोपला होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तिनी त्याच्या डोक्यात दगड घालुन त्यास मारन्याचा प्रयत्न केला. याबाबतची खबर डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यास उपचारासाठी ससून रुग्णलयात दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: try to kill beggar at Pune

टॅग्स