माळशिरस येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी

माळशिरस येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी

Published on

MLS26B02608
माळशिरस : मारुती मंदिरात कीर्तन करताना संतोष महाराज व उपस्थित भाविक.
---
माळशिरसमध्ये तुकाराम बीज उत्साहात
माळशिरस : येथील मारुतीदेव व श्रीरामदेव मंदिरात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी (ता. ४) रात्री १० ते १२ या वेळेत मंदिरात जागर करण्यात आला. त्यानंतर आज (गुरुवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. संतोष महाराज ननवरे (दसूर)) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता उपस्थित भाविकांनी गुलाल व फुले टाकून तुकाराम बीज साजरी केली. तुकाराम बीजेनिमित्त मंदिरात आर्कषक सजावट करण्यात आली होती. बीजेनिमित्त मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. श्री संत तुकाराम महाराज आळंदीवरून पंढरपूरला जाताना या मंदिरात त्यांनी रात्री कीर्तन केले. कीर्तन सुरू असताना सर्व श्रोते निघून गेले, तेव्हा तुकाराम महाराज मारुतीकडे पाहून म्हणाले, देवा तुम्ही झोपा. तेव्हापासून या मंदिरातील मारुतीची मूर्ती कललेली असून, त्यास झोपाळू हनुमान म्हणतात, अशी आख्यायिका आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com