मलवडीत तुकाराम बीजोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

मलवडीत तुकाराम बीजोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

Published on

मलवडीत तुकाराम बीजोत्सव उत्साहात

दहिवडी, ता. ६ : माण तालुक्यातील श्री क्षेत्र मलवडी येथे श्री संत शिरोमणी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात झाला. फुलांच्या उधळणीत काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली.
बीजोत्स्वाचे यंदा ६१ वे वर्ष होते. यानिमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हभप धनंजय चव्हाण (देगाव, सातारा) यांचे काल्याचे व फुलाचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सर्वांना काल्याचा प्रसाद देण्यात आला. त्यानंतर वारकरी, टाळकरी, विणेकरी यांच्या साथीने मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सप्ताहात दररोज पहाटेपासून काकडा आरती, ज्ञानेश्वरीचे पारायण, प्रवचन, हरिपाठ, महाप्रसाद, कीर्तन व त्यानंतर जागर असे कार्यक्रम झाले.
हभप अनिल डुबुले (तासगाव), नीलेश माळशिकारे (कोहाळे बुद्रुक), आझाद गुजर (सातारा), सावता शिंदे (तेलदरा), श्रीराम अभंग (इंदापूर), महेश माने (कुळकजाई), नवनीत करगणीकर (करगणी), संजय वेलुकर (पुणे) यांनी कीर्तन सेवा दिली.
चांगदेव शिंदे (तेलदरा), विलास देवकर (मलवडी), शिवाजी जगदाळे (बोथे), मुरलीधर शिंदे (तेलदरा), चव्हाण महाराज (मलवडी), प्रा. अवघडे महाराज (शेवरी) यांची प्रवचने झाली, तसेच मलवडी, कासारवाडी, बोराटवाडी, भांडवली, आंधळी, टाकेवाडी व तेलदरा येथील भजनी मंडळांनी हरीजागर केला. सप्ताहाचे आयोजन समस्त मलवडी ग्रामस्थांनी केले होते.
..................................
07345
मलवडी : श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवात काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com