मलवडीत आजपासून तुकाराम महाराज बीजोत्सव

मलवडीत आजपासून तुकाराम महाराज बीजोत्सव

Published on

मलवडीमध्ये आजपासून
तुकाराम महाराज बीजोत्सव

दहिवडी, ता. २५ : श्री मल्हारी म्हाळसाकांताच्या पावन नगरीत व महंत श्री शांतिगिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माण तालुक्यातील श्री क्षेत्र मलवडी येथे श्री संत शिरोमणी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बीजोत्सवाचे यंदा ६१ वे वर्ष आहे.
सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वर पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, महाप्रसाद, रात्री कीर्तन व त्यानंतर जागर असे कार्यक्रम होतील.
सप्ताहात हभप अनिल डुबुले (तासगाव), नीलेश माळशिकारे (कोहाळे बुद्रुक), आझाद गुजर (सातारा), सावता शिंदे (तेलदरा), श्रीराम अभंग (इंदापूर), महेश माने (कुळकजाई), नवनीत करगणीकर (करगणी), संजय वेलुकर (पुणे) हे कीर्तन सेवा देतील.
हभप धनंजय चव्हाण (देगाव, सातारा) यांचे काल्याचे व फुलाचे कीर्तन होईल. चांगदेव शिंदे (तेलदरा), विलास देवकर (मलवडी), शिवाजी जगदाळे (बोथे), मुरलीधर शिंदे (तेलदरा), चव्हाण महाराज (मलवडी), प्रा. अवघडे महाराज (शेवरी) हे प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत.
त्याचबरोबर मलवडी, कासारवाडी, बोराटवाडी, भांडवली, आंधळी, टाकेवाडी व तेलदरा येथील भजनी मंडळ हरीजागर करणार आहेत. व्यासपीठ चालक हभप महेश माने (कुळकजाई) हे आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मलवडी ग्रामस्थांनी केले आहे.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com