

SPU26B06538
वडझिरे (ता. पारनेर) ः तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शन घेताना भाविक.
तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे वडझिरेत स्वागत
पारनेर, ता. ४ : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे वडझिरे येथे संबळ व तुणतुण्याच्या निनादात, पुष्पवृष्टी करत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
वडझिरे बसस्थानक ते विठ्ठल-रुक्मिणी माता मंदिरापर्यंत पलंगाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जवळे, निघोज, देवीभोयरे, पाडळी दर्या परिसरातील तिळवण तेली समाज बांधवांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथून पलंगाचे प्रस्थान होते. घोडेगाव ते तुळजापूर हा सुमारे ५० दिवसांचा पायी प्रवास करण्याची परंपरा पलंगे घराण्याने आजही अखंडपणे जपली आहे, अशी माहिती उमेश वसंत पलंगे व प्रफुल्ल गणेश पलंगे यांनी दिली. अहिल्यानगर हे आई तुळजाभवानी मातेचे माहेर मानले जाते. नवरात्रातील तिसऱ्या माळेला राहुरीहून येणाऱ्या पालखी व पलंगाची भेट व मिरवणूक भिंगार येथे होत असून, जानकोजी भगत (देवकर) यांच्या परंपरेनुसार हा सोहळा आजही सुरू आहे.
वडझिरे येथे शेजवळ परिवाराच्या वतीने सायंकाळी सात वाजता देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत देवीचा गोंधळ व भक्तिगीते सादर करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. असूराचा वध केल्यानंतर देवी निद्रावस्थेत जाते, अशी धार्मिक श्रद्धा असून, त्यावेळी देवीची मूर्ती नवीन पलंगावर ठेवली जाते. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला जुन्या पलंगाचे होमात विसर्जन करण्याची परंपरा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.