Pune : कात्रज जुना बोगदा धोकादायक; पण बांधकाम विभागाला पत्ताच नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune katraj

Pune : कात्रज जुना बोगदा धोकादायक; पण बांधकाम विभागाला पत्ताच नाही!

पुणे : अनेक ठिकाणी पावसाचे गळणारे पाणी, रस्त्यावर पडलेले खड्डे, निसरडा झालेला रस्ता आणि बोगद्याच्या दोन्ही बाजूला जमा झालेला चिखल आणि राडारोडा... अशी अवस्था सध्या कात्रजच्या जुन्या बोगद्याची झाली आहे. या अशा अवस्थेमुळे कात्रज जुन्या बोगद्यातील प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे. अन् विशेष म्हणजे बोगद्याची ही दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहीत नसल्याचे दिसून येते.

पुण्याचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून कात्रज बोगदा ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपूर्वी कात्रज नवीन बोगदा सुरू झाला मात्र, आजही जुन्या बोगद्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र ऐतिहासिक अशा कात्रज जुन्या बोगद्याची सध्या दुरवस्था झाली आहे. कात्रज जुना बोगदा सुमारे ३०० मीटर अंतराचा आहे. या बोगद्यातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. मात्र सध्या बोगद्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी गळते आहे. एक ठिकाणी तर पावसाच्या पाण्याची संततधार सुरू आहे.

त्यामुळे बोगद्यातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अंधारात हे खड्डे दिसत नसल्याने दुचाकीवाहनांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. बोगद्यातील रस्त्याच्या दुतर्फा आतील बाजूस चिखल आणि राडारोडा साचला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास धोकादायक आणि असुरक्षित झाला आहे. या बोगद्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

बोगद्यातील सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

- देवेन मोरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Tunnel Katraj Vulnerable Construction Department Unaware Water Able To Work Pune Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..