महिनाभरात तूरडाळ ३५ रुपयांनी महागली

प्रवीण डोके 
Wednesday, 7 October 2020

पंचवीस दिवसात तूरडाळ ३५ रुपयांनी तर उडीदडाळ २० रुपयांनी महागली आहे. घाऊक बाजारात पंचवीस दिवसांपूर्वी तूरडाळ आणि उडीदडाळ ८८ रुपये किलो होती. ती मंगळवारी वाढून तूरडाळ १२३ तर उडीदडाळ १०८ रुपये प्रतिकिलो झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १२८ ते १३०, तर उडीदडाळ ११५ ते ११८ रुपये किलो विकली जात आहे.

पुणे - पंचवीस दिवसात तूरडाळ ३५ रुपयांनी तर उडीदडाळ २० रुपयांनी महागली आहे. घाऊक बाजारात पंचवीस दिवसांपूर्वी तूरडाळ आणि उडीदडाळ ८८ रुपये किलो होती. ती मंगळवारी वाढून तूरडाळ १२३ तर उडीदडाळ १०८ रुपये प्रतिकिलो झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १२८ ते १३०, तर उडीदडाळ ११५ ते ११८ रुपये किलो विकली जात आहे. 
देशभरातील काही मोठ्या कंपन्यांनी कच्च्या डाळींचा मोठ्या प्रमाणात साठा केला आहे. तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून, डाळीमध्ये तेजी आणली असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र शासनाने सध्या मालाच्या साठवणूक क्षमतेवरील नियंत्रण उठविले आहे. त्यामुळे अनेक बड्या कंपन्या आणि संबंधित लोकांनी डाळींच्या लाखो पोत्यांचा साठा केला आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.   महिन्यापूर्वी बाजारात साधारणतः दररोज १४० - १५० टन डाळ येत होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या बाजारात फक्त ८०-९० टन  
डाळ येत आहे. सध्या बाजारात शेतकरी माल आणत नाहीत. त्यामुळे बाजारात डाळींचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती व्यापारी जितेंद्र नहार यांनी दिली. 

दरम्यान, आफ्रिकेतील तूर डाळ पुढील महिन्यापासून आयात केली जाणार आहे. तेथील तूरडाळ साधारणतः ६० ते ६५ रुपये 
किलो मिळेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आम्ही जेवणात डाळींचा वापर जास्त करतो. मात्र त्यांचे भाव खूपच वाढले आहेत. त्यामुळे डाळींचा वापर फारच कमी केला आहे.
- नेहा कोठावळे, गृहिणी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turdal Rate Increase rupees thirty five in one month