
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात दुष्काळी गाव म्हणुन ओळख असलेल्या धामणी गावातील शेतकरी एकत्र येत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक मळ्यातील शेतकऱ्यांनी अधिका- अधिक संख्येने एकत्र येऊन शेतीसाठी पाणी नेण्याचे शिवधनुष्य उचलून उपक्रम यशस्वी करण्याचा निश्चय केला आहे. काल गुरुवारी हिवरकर मळा, टेकाडेमळा, गवंडीमळा, माळीमळा परिसरातील सुमारे दोनशे शेतकरी एकत्र येत एकजुटीने सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून डिंभे धरणाचा कालव्यातुन सामुदायिक सिंचन योजनेच्या कामाचा प्रारंभ करून शिवार पाणीदार करण्याचा संकल्प केला आहे.