पुणे : पतित पावन संघटनेच्या धमकीनंतर, तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मॉडर्न महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्म शताब्दी वर्षानिमीत्त आयोजित कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावरून महाविद्यालयास धमकी आल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे गांधी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुणे : मॉडर्न महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्म शताब्दी वर्षानिमीत्त आयोजित कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावरून महाविद्यालयास धमकी आल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे गांधी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यांनी याबाबत ट्विट देखील केले असून, "गोली मारे गॅंग इन ऍक्‍शन' असे त्यात म्हटले आहे. ते म्हणाले, "बापूजीच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मला आज सकाळी कार्यक्रम रद्द झाल्याचा दूरध्वनी आला. 

कोथरूड गांधी भवनचे अन्वर राजन यांनाही या कार्यक्रमास बोलावण्यात आले होते. परंतु त्यांनाही कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास माझी उपस्थिती असेल, तर तो उधळून लावला जाईल, अशी धमकी पतित पावन संघटनेने दिल्याची माझी माहिती आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tushar Gandhis program at Modern College was canceled

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: