चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात बुधवारी स्थानिक कांद्याची सुमारे सत्तर हजार पिशव्यांची आवक झाली. कांद्याच्या घाऊक बाजारात मोठी घसरण होत प्रतिकिलोला २० ते ३० रुपये भाव मिळाला आहे. भावात घसरण झाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. 

पुणे - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात बुधवारी स्थानिक कांद्याची सुमारे सत्तर हजार पिशव्यांची आवक झाली. कांद्याच्या घाऊक बाजारात मोठी घसरण होत प्रतिकिलोला २० ते ३० रुपये भाव मिळाला आहे. भावात घसरण झाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सद्या स्थानिक कांद्यांची मोठी आवक होत आहे. भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी कांद्याची काढणी झटपट करून कांदा विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक वाढत आहे. आवक वाढल्याने भावामध्ये आणखीच घसरण होत आहे. 

दरम्यान, उत्पादनातील घटीमुळे एका एकरात फक्त तीस पिशव्या कांदा निघत आहे. जेथे मागील वर्षी दीडशे पिशव्या निघत होत्या, तेथे यावर्षी फक्त तीस पिशव्या निघाल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. काद्यांवरची निर्यातबंदी केंद्र सरकारने त्वरित उठवावी, अशी मागणी करणार असल्याचे शेतकरी राम गोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty per kg onion in Chakan