esakal | सत्तावीस शिक्षकांचा बुधवारी होणार गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

Twenty-seven teachers will be honored on Wednesday

 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील २७ शिक्षकांना २०१८-१९ या वर्षासाठीचा जिल्हा शिक्षक  पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सत्तावीस शिक्षकांचा बुधवारी होणार गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील २७ शिक्षकांना २०१८-१९ या वर्षासाठीचा जिल्हा शिक्षक  पुरस्कार जाहीर झाले आहेत. तिघांची गुणवंत केंद्र प्रमुख आणि दोन दिव्यांग शिक्षकांची गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत किमान पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्यात यशस्वी ठरलेल्या ४० जणांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुण्यात बुधवारी (ता.४) या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची तालुकानिहाय नावे - आंबेगाव : रविकिरण डोंगरे, कमल सिनलकर. बारामती : राणी ढमे, शरद मचाले. भोर : विठ्ठल दानवले, संगीता बोरगे, मनीषा बारवकर. दौंड : विजय ठोंबरे, बाळासाहेब थोरात. हवेली : संतोष वायसे, नंदा काशीद. इंदापूर : सुनीता पांढरे, संजय मस्के. जुन्नर : अरुण आरोटे, सखाराम शेंडकर. खेड : संजय नाईकरे, प्रभावती कडलग. मावळ : अशोक मिसाळ, गिरीश ओतूरकर. मुळशी : लव गायकवाड, वृषाली भंडारी. पुरंदर : प्रकाश जगताप, रघुनाथ ठवाळ. शिरूर : सुभाष कोरडे, रामदास थोरात. वेल्हे : दयानंद लोंढे, प्रशांत जगताप.
दिव्यांग गुणवंत शिक्षक पुरस्कार - खेड : नारायण बोरकर.  मुळशी : मृणाल मारणे. विषयतज्ज्ञ -पंचायत समिती मुळशी :  उमेश थोपटे गुणवंत केंद्र प्रमुख पुरस्कार - शिरूर : महादेव बाजारे.  बारामती : जयश्री झाडबुके.  मावळ : कृष्णा भांगरे.

loading image
go to top