Aarya Bhalekar
sakal
नारायणगाव - अति विषारी नागाचा सर्पदंश झाल्यानंतर तीन वेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अत्यावस्थ झालेल्या महाळुंगे पडवळ येथील आदिवासी शेतमजूर कुटुंबातील आर्या योगेश भालेकर या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशन रुग्णालयात वेळेत अतितातडीचे योग्य उपचार मिळाल्याने चिमुकलीला जीवदान मिळाले.