

mephedrone Drugs seized Crime
पुणे - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कॅम्प परिसरात कारवाई करत मेफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे १०२ ग्रॅम मेफेड्रोन आणि दोन दुचाकींसह सुमारे पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.