
पुणे - एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अटक केली. रास्ता पेठेतील एका बँकेच्या एटीएममध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी अशाच प्रकारे वारजे परिसरातही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.