पुण्यात वाघाच्या कातडे विकणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पुणे : वाघाचे कातडे विक्रीसाठी आणणाऱया दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडुन पाच लाख रूपये किंमतीचे कातडे व दूचाकी असा साडे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे : वाघाचे कातडे विक्रीसाठी आणणाऱया दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडुन पाच लाख रूपये किंमतीचे कातडे व दूचाकी असा साडे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामेश्वर हरीशचंद्र देशमुख (वय 35) व विजय गणपत जगताप (वय 38, दोघेही रा.औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री दोघेजण वाघाचे कातडे विक्री करण्यासाठी घेऊन आले असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली.

 पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे व लहु सातपुते यांनी त्यांच्या पथकासह समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचला. त्यानंतर दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचे वाघाचे कातडे व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested for selling tiger skin in Pune