मेफेड्रोन विक्रीसाठी आणणारे अडकले पुणे पोलिसांच्या सापळ्यात

Two Arrested with a Women for selling mephedrone in Pune
Two Arrested with a Women for selling mephedrone in Pune

पुणे : अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडुन सव्वा तीन लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला.

विवेक तुळशीराम लुल्ला (वय 43) व तसेच हेमा किसनलाल सिंग (वय 30, दोघेही रा.नवी मुंबई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत गस्त घालत होते. त्यावेळी बाणेर येथील नॅशनल इंन्शोरंन्स अकॅडमीजवळ दोघेजण दोन एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

त्यानुसार, त्यांच्या पथकाने नॅशनल इंन्शोरंन्स अकॅडमी परिसरात सापळा लावला. त्यावेळी तेथे एक महिला व एक पुरुष संशयास्पदरित्या फिरताना दिसुन आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडे 65 ग्राम वजनाचे व सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ सापडला. त्यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com