
उंडवडी : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच बारामतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बारामती- पाटस रस्त्यावरील जराडवाडी हद्दीत दोन दुचाकी एकमेकांना धडकल्याने अपघात झाला आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.