
पुणे : येरवड्यातील एका मॉलमधील पबमध्ये तरुणींना धक्का देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री डान्स फ्लोअरवर नृत्य करणाऱ्या तरुणींना गणेश दादाभाऊ घावटे (वय ३४, रा. अण्णापूर, ता. शिरूर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी धक्का दिला.