दोन सख्या भावांचा दोनच दिवसात झाला कोरोनामुळे मृत्यू

राजकुमार थोरात
Friday, 28 August 2020

वालचंदनगर येथील दोन सख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील किराणा व्यापारी कुंटूबातील सहा जणांना गेल्या चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.यामध्ये तिघा सख्या भावाचा समावेश होता. यातील एका भावाचा मृत्यू बुधवार (ता. २६) रोजी झाला व दुसऱ्या भावाचा मृत्यू  आज गुरुवार झाल्याची घटना घडली.

वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील दोन सख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील किराणा व्यापारी कुंटूबातील सहा जणांना गेल्या चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तिघा सख्या भावाचा समावेश होता. यातील एका भावाचा मृत्यू बुधवार (ता. २६) रोजी झाला व दुसऱ्या भावाचा मृत्यू गुरुवार  (ता. २७) झाल्याची घटना घडली. यातील एका भावाचे वय ४८ व दुसऱ्या भावाचे वय ५५ होते. घरातील चार नागरिकावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये आज कोरोनाचा उद्रेक झाला. एका दिवसामध्ये ५० कोरोनागस्त रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची संख्या ७०० च्या जवळ पोहचली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brothers died of corona in just two days