esakal | Vidhan Sabha 2019 : पुण्यात पानशेतमध्ये बंदुकीसह दोन काडतुसे जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Two cartridges with guns seized in Panshet in Pune

Vidhan Sabha 2019 : पुणे :  आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली त्यानुसार, रविवारी पानशेत येथे एक बंदूक व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेत रामा बबन मरगळे, (वय 24 वर्षे, रा. पानशेत कुरण बुद्रुक, वरचीवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे) यास ताब्यात घेऊन वेल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Vidhan Sabha 2019 : पुण्यात पानशेतमध्ये बंदुकीसह दोन काडतुसे जप्त

sakal_logo
By
राजेंद्र कापसे

Vidhan Sabha 2019 पुणे :  आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली त्यानुसार, रविवारी पानशेत येथे एक बंदूक व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेत रामा बबन मरगळे, (वय 24 वर्षे, रा. पानशेत कुरण बुद्रुक, वरचीवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे) यास ताब्यात घेऊन वेल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता अवैध हत्यारे शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी वेगवेगळे पथके तयार केली होती. पानशेत बाजारपेठेमध्ये एक केसरी रंगाचा टी शर्ट व काळे रंगाची ट्रॅक पँट घातलेल्या व्यक्तीकडे बंदूक असल्याची माहिती मिळाली होती.

फौजदार अमोल गोरे, सहायक फौजदार दिलीप जाधव, श्रीकांत माळी, हवालदार रविंद्र शिणगारे, राजू चंदनशिव, कॉन्स्टेबल अमोल शेडगे यांनी रविवारी दुपारी दोन वाजता वेल्हे तालुक्यातील पानशेत रामा बबन मरगळे, (वय 24 वर्षे, पानशेत कुरण बुद्रुक, वरचीवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे) यास ताब्यात घेवून दोन पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे बंदूक व दोन जिवंत काडतुसे अशा 10 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला आहे. त्यांच्या विरूध्द वेल्हा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.