महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे दोन लिपिक लाच घेताना ACB च्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe crime

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे दोन लिपिक लाच घेताना ACB च्या जाळ्यात

पुणे : सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकीसाठीचा शासकीय परवाना प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी 25 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजाराची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन लिपिकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनिष्ठ लिपिक तानाजी गोविंदराव दबडे ( वय 50) व प्रथम लिपिक विलास दगड़ू तिकोणे (वय 50) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तिने "एसीबी"कडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व्यक्तिचा मुलगा अभियंता आहे. त्याचे सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकीसाठीचा शासकीय परवाना मिळावा यासाठीचा प्रस्ताव त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे पाठवविला होता. त्यावेळी तिकोणे याने संबंधित प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडुन 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दबडे याने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली.

तडजोड झाल्यानंतर 25 हजार रूपयांऐवजी 15 हजार रुपये देण्याचे निश्चित झालेया. दरम्यान, तक्रारदार यांना हा सर्व प्रकार अयोग्य वाटल्याने त्यांनी याबाबत "एसीबी"कडे तक्रार केली. त्यानुसार "एसीबी"ने शुक्रवारी मध्यवर्ती कार्यालयातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये सापळा रचून 15 हजार रुपयाची लाच घेताना दबडे यास, तर तिकोणे यास लाच मागण्यासाठी मदत केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.अशी माहिती "एसीबी"चे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.

टॅग्स :ACBacb arrests