esakal | कोयत्याचा धाक दाखवून टेम्पो चालकास लुटले, दोन सराईत गुन्हेगारांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आईला घेऊन घरी निघालेल्या चालकाचा टेम्पो अडवून त्यास कोयत्याचा धाक दाखवित सराईत गुन्हेगारांनी टेम्पो चालकास लुटले. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली.

कोयत्याचा धाक दाखवून टेम्पो चालकास लुटले, दोन सराईत गुन्हेगारांना अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - आईला घेऊन घरी निघालेल्या चालकाचा टेम्पो अडवून त्यास कोयत्याचा धाक दाखवित सराईत गुन्हेगारांनी टेम्पो चालकास लुटले. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली.

मंगेश विजय जडीतकर (वय 20, रा. दांगट पाटील नगर ) व गौरव सुरेश पासलकर (वय 22 , रा. वारजे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास जानवळे (वय 26, रा. वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पोचालक आहेत. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या आईला समवेत घेऊन त्यांच्या घरी जात होते. त्यांचा टेम्पो वारजे माळवाडी येथील यश मित्रमंडळ चौकात आला. त्यावेळी मंगेश, गौरव व त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी फिर्यादीचा टेम्पो अडविला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी विकास यांना टेम्पोतून जबरदस्तीने खाली खेचून त्यांच्या मानेला कोयता लावला. त्यांच्या खिशातील साडे तीन हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच फिर्यादी विकास यांच्या आईने आरोपींना पैसे दिले नाहीत, त्यामुळे आरोपींनी त्यांना दगडाने मारहाण करीत दुखापत केली. दरम्यान, हा सर्व पाहणाऱ्या नागरीक त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. व्ही. शेवते तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top