पुणे : लोणीकंद तलावात आढळले दोन मृतदेह

सागर आव्हाड
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पाठीमागील तलावात दोन मृतदेह आढळले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणीकंद पोलिसात काल नवरा बायको बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पाठीमागील तलावात दोन मृतदेह आढळले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणीकंद पोलिसात काल नवरा बायको बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तरुण तरुणीचा मृतदेह बाहेर काढून ससूनकडे रवाना करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे नवरा बायको असून दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार बेपत्ता झालेल्या नवरा बायकोची नावे मंगेश नागरे आणि प्रियांका नागरे असे आहे. दोघांचे  मुळगाव अस्तगाव, नादगाव नाशिक असून 
सध्या वाघोलीत राहत होते. मंगेश नागरेच्या भावाने दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता झालेल्या नवरा बायकोचा हे मृतदेह आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Dead Body Found in Lonikand lake at pune