Landslide : माळशेज घाटामध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू; मृतामध्ये सात वर्षीय बालकाचा समावेश

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून दोन जन जागीच ठार झाले असून, मृतामध्ये सात वर्ष बालकाचा समावेश.
Landslide on Rickshaw
Landslide on Rickshawsakal

ओतूर - माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून दोन जन जागीच ठार झाले असून, मृतामध्ये सात वर्ष बालकाचा समावेश असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.

या अपघातात राहुल बबन भालेराव (वय-३०) व स्वयम सचिन भालेराव (वय-०७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मुलुंड पश्चिम, मुंबई, मुळ गाव चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षा क्रमांक एमएच ०३ डिएस ३२११ या रिक्षाने रिक्षा चालक बबन गोपाळ भालेराव, त्यांची पत्नी विमल बबन भालेराव मुले सचिन बबन भालेराव, राहुल बबन भालेराव व त्यांचा नातू स्वयम सचिन भालेराव असे एकूण पाच जण मुलुंड पश्चिम, मुंबई येथुन त्यांचे मुळ गाव चंदनापुरी, ता. संगमनेर, येथे ता. ११ रोजी येत होते.

सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून त्यामध्ये राहुल बबन भालेराव (वय-३०) व स्वयम सचिन भालेराव (वय-०७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर विमल बबन भालेराव (वय-५५) यांच्या हाताला साधी दुखापत झालेली असून, बबन गोपाळ भालेराव (वय-५९) व सचिन बबन भालेराव (वय-४०) हे सुखरूप आहेत. दोन्ही मृतदेह व जखमी विमल भालेराव यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com