Accident : टेम्पोच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू ; दोन लहान मुले वाचली

पुणे-पानशेत रस्त्यावर खडकवासला चौपाटीच्या पुढील बाजूला एमइएस कॅन्टीन बसथांबा परिसरात टेम्पोने दुचाकी व पायी चालणाऱ्याना धडक दिली.
Accident
Accidentsakal

खडकवासला - पुणे-पानशेत रस्त्यावर खडकवासला चौपाटीच्या पुढील बाजूला एमइएस कॅन्टीन बसथांबा परिसरात टेम्पोने दुचाकी व पायी चालणाऱ्याना धडक दिली. या घटनेत पायी चालणाऱ्या व्यक्ती आणि दुचाकी चालक यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत विनायक दिलीप भगत (वय-३२, रा. भगतवाडी बहूली, सध्या- कोंढवे धावडे) व पांडुरंग शंकर रणधीर (वय-७१, रा. जयहिंद नगर, खडकवासला) या दोघांचा मृत्यू झाला आहे. भगत हे दुचाकी चालवत होते. ते कोंढवे- धावडे येथून सकाळी सहा वाजता सिंहगडला पायी चालण्यासाठी जात होते. त्यांच्या सोबत त्यांचे दोन भाचे होते. ते या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. तर खडकवासला गावातील रणधीर हे सकाळी चालण्यासाठी पानशेत रस्त्याने चालत होते.

अपघातातील टेम्पो हा पुण्याच्या दिशेने येत होता. भगत सिंहगडाकडे जात होते. समोरून आलेल्या टेम्पोने या दोघांना धडक दिली. अपघातानंतर टेम्पो उजव्या बाजूच्या भिंतीला धडकला आहे. येथील भिंतीतील दगड खाली पडले आहेत.

अपघातानंतर, भगत यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी त्यांना वारजे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे, रुग्णालयाने याबाबतची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना दिली. ‘आम्ही याची माहिती घेतली. त्यामुळे, हवेली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याची कागदपत्रे त्यांच्याकडे सादर केली आहे.

अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी दिली. तर जखमी रणधीर यांना देखील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा ही मृत्यू झाला. ते डीआयएटी मधून सेवानिवृत्त झाले होते. माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष रणधीर यांचे ते वडील होत.

वारजे पोलीस यांच्याकडून माहिती मिळाल्यावर ‘अपघाताबाबत आकस्मिक मयत दाखल अशी नोंद केली आहे. अपघाताचे काही प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांचाकडून माहिती घेऊन गुन्हा दाखल करणार आहे.’ अशी माहिती पोलिस निरीक्षक सचीन वांगडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com