
पुणे/औंध - येथील ब्रेमेन चौकातून परिहार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) डीपीच्या खोलीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.