पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी घडल्या फास घेतल्याच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुण्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृतदेह ससून रुग्णालात पाठविण्यात आले आहे.

पुणे ः  पुण्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृतदेह ससून रुग्णालात पाठविण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर येथील जुना तोफखाना येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबरोबरच न्यायालयाच्या गेट क्रमांक एकसमोरील परिसरामध्ये एका तरुण कामगारानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दोघांचेही आत्महत्या करण्याबाबतचे कारण व वैयक्तीक माहिती अद्याप मिळालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Died due to Suicide by hanged in Pune at two Different places