छत्रपतीच्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या दोन वेगवेगळ्या वेळा

राजकुमार थोरात
Sunday, 25 October 2020

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ विद्यमान संचालक मंडळाच्या हस्ते रविवार (ता. २५) रोजी दसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजून 0५ मिनिटांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन करुन कार्यक्रम पत्रिका ही तयार करण्यात आली होती. तसेच फोनवरुन, संचालक, सभासद व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना वेळ ही देण्यात आली होती.

वालचंदनगर - भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या ऊस गळीत हंगामाच्या  शुभारंभाच्या दोन वेगवेगळ्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या असून वेळेवरुन राजकारण सुरु झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ विद्यमान संचालक मंडळाच्या हस्ते रविवार (ता. २५) रोजी दसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजून 0५ मिनिटांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन करुन कार्यक्रम पत्रिका ही तयार करण्यात आली होती. तसेच फोनवरुन, संचालक, सभासद व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना वेळ ही देण्यात आली होती. मात्र अचानक वेळेमध्ये बदल करण्यात आला. सकाळी ११ वाजून ५ मिनटा ऐवजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे नियोजन करुन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर अगोदरच्या नियोजनाप्रमाणे ११ वाजून ५ मिनटांच्या मुर्हूतावर ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात जाचक यांनी सांगितले की, ठरलेल्या नियोजनामध्ये अचानक बदल करण्यात आला असला तरीही ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाची मुर्हूतावर सुरवात  करण्यात येणार आहे.

यासंदर्भात छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, सकाळी ९ वाजता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते गळीत हंगामाचा  शुभारंभ होणार असून सभासदांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two different times of the start of Chhatrapatis sugarcane crushing season