esakal | पुण्यात अग्नितांडव; वाघोलीत वाहनांच्या तर हांडेवाडीत प्लास्टीक गोडाऊनला आग (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

fire.jpg

- मारुती सुझुकी सर्विस सेंटरच्या चारचाकी वाहनांच्या गोडाउन आग लागण्याची घटना रविवारी पहाटे वाघोली येथे घडली
- वाघोलीध्ये गोडाऊनला आग लागलेली असताना दूसरीकडे हडपसर हांडेवाडी-होळकर रस्ता येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला रविवारी अडीच वाजता आग लागली

पुण्यात अग्नितांडव; वाघोलीत वाहनांच्या तर हांडेवाडीत प्लास्टीक गोडाऊनला आग (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे :  पुण्यात रविवारी पहाटे आगीच्या दोन घडना घडल्या आहे. वाघोलीतील वाहनांच्या तर हांडेवाडीत प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागल्याची घडना समोर आली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशामकदल पोहचले असून आग आटोक्यात आणली आहे.

वाघोलीमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग
वाघोलीतील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी सर्विस सेंटरचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला रविवारी पहाटे दोन वाजता अचानक आग लागली. त्यामध्ये वाहनांचे सूटे भाग मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. याबाबत अग्निशामक दलास खबर मिळाल्यानंतर पुणे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, पीएमआरडीएच्या दोन, एमआयडीसी एक असे पाच अग्निबंब व चार पाण्याचे टँकरने जवानानी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. उशीराने आग शमविण्यात जवानाना यश आले.

हांडेवाडीत प्लास्टिकच्या गोडाऊनला आग
वाघोलीमध्ये गोडाऊनला आग लागलेली असताना दूसरीकडे हडपसर हांडेवाडी-होळकर रस्ता येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला रविवारी अडीच वाजता आग लागली. त्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानानी सकाळी उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळविता आले.

loading image
go to top