Hadapsar Crime : मकोका गुन्ह्यात फरार असलेले दोघे चित्रपट पाहण्यासाठी आले; मात्र गजाआड झाले

हडपसर मधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले. मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले.
mokka accused arrested
mokka accused arrestedsakal
Updated on

वाघोली - हडपसर मधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले. मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले. मकोका गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले.

धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय-22 वर्षे, रा. दिघी) व बादशहशिंग पोलादसिंग भोंड (वय-23 वर्षे, रा. शिवआदर्श नगर, दिघी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

दिघी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवसापासून फरार होते. मिळालेल्या माहितीनुसार, युनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसर मधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. युनिट सहाचे अतिरिक्त कार्यभार प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com