Video : पिंपरी-चिंचवडमधील 'या' बंधाऱ्याचे दरवाजे उघडले एका तपानंतर

Video : पिंपरी-चिंचवडमधील 'या' बंधाऱ्याचे दरवाजे उघडले एका तपानंतर

पिंपरी : प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडणे, सतत वाढणाऱ्या जलपर्णीमुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणे, अशा समस्या थेरगाव येथील पवना नदीच्या पात्रात असणाऱ्या केजुदेवी बंधारा परिसरात सातत्याने व्हायच्या. मात्र, आता केजुदेवी बंधारा परिसराच्या खालच्या भागात असणारे दोन दरवाजे महापालिकेने बारा वर्षांनी उघडल्यामुळे या परिसरातील नदीचे पात्र स्वच्छ होणार आहे. 

बंधाऱ्याच्या भागात खाली असणारे दोन दरवाजे बारा वर्षांपासून उघडले नव्हते. त्यामुळे याठिकाणी खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस तयार व्हायचा, याखेरीज जलपर्णी वाढण्यासाठी पोषक वातावरण व्हायचे. नदीपात्रात असणाऱ्या माशांना त्यामुळे ऑक्‍सिजन मिळण्यात देखील अडचण यायची. त्यामुळे आतापर्यंत तीन ते चार वेळा याठिकाणी नदीमधील मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार झाले होते. बंधाऱ्याच्या परिसरातील खालच्या भागात असणारे दरवाजे उघडल्यामुळे नदीमध्ये खालच्या भागात साचलेला गाळ निघून गेला असून, नदीपात्र स्वच्छ झाले आहे. याच ठिकाणी पद्‌मजी पेपर मिलच्या परिसरात असणाऱ्या बंधाऱ्याचे खालचे दरवाजे 35 वर्षांपासून बंद होते, ते देखील आता उघडले असल्यामुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे. दरम्यान, चिंचवड येथील मोरया देवस्थानाच्या परिसरातील नदी पात्राच्या परिसरात साचलेला गाळ काढण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रावेत ते चिंचवडदरम्यान पवना नदीचे पात्र स्वच्छ होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिक म्हणतात...

केजुदेवी बंधारा परिसरात सुटीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी येत असतात. मात्र, त्यांना जलपर्णी आणि नदीतल्या सांडपाण्याचा वास कायम सहन करावा लागत असे. आता महापालिका आणि स्थानिक नागरिकांनी हा परिसर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे या नदीचे पात्र स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 केजुदेवी बंधारा आणि पद्‌मजी पेपर मिलजवळ असणारा बंधाऱ्याचे खालचे दरवाजे अनेक वर्षांपासून बंद होते. त्यामुळे नदीपात्राच्या खालच्या भागात गाळ, मैला मोठ्या प्रमाणात साचला होता. आता हे दरवाजे उघडल्यामुळे नदीच्या खालचा भाग हा स्वच्छ झाला आहे. नदीचे पात्र कायम स्वच्छ राहावे. त्याठिकाणी जलपर्णी वाढू नये, म्हणून हे दरवाजे वर्षभर खुले ठेवण्यात येणार आहे. याखेरीज बंधाऱ्याच्या परिसरातील दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. 

- रामदास तांबे, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com