"जम्बो'तून दोनशे बेड गायब 

ज्ञानेश सावंत 
Saturday, 24 October 2020

 जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आठशे बेडची व्यवस्था असल्याची घोषणा केली असली तरी आता सहाशेच बेड ठेवण्याचा आदेश "जम्बो' चालविणाऱ्या "मेड-ब्रो'ला दिला आहे.

पुणे - जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आठशे बेडची व्यवस्था असल्याची घोषणा केली असली तरी आता सहाशेच बेड ठेवण्याचा आदेश "जम्बो' चालविणाऱ्या "मेड-ब्रो'ला दिला आहे. कोरोना रुग्णांसाठी सहाशे बेडच्या कामाचा आदेश "पीएमआरडीए' ने गुरुवारी दिला आहे. परिणामी, दोनशे बेड कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात 
जात आहे. 

येत्या डिसेंबर, जानेवारीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवितानाच त्या प्रमाणात मोफत उपचारासाठी बेड तयार ठेवण्याची सूचना केंद्रीय पथकाने स्थानिक यंत्रणांना केली आहे. तरीही, "जम्बो'तून हळूहळू बेड कमी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रूग्णसंख्या कमी असल्याने सहाशे बेड सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे, असे "पीएमआरडीए'ने सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात आठशे बेडसाठी पायाभूत सुविधा उभारून "जम्बो' सुरू केले आहे. ऑगस्टपासून पुढील सहा महिने एवढ्याच क्षमतेने सेंटर चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता मात्र थेट बेडच कमी करण्यात आल्याचे "मेड-ब्रो'ला दिलेल्या "वर्क ऑर्डर'वरून दिसून येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांचे प्रमाण वाढतेय 
राजकीय दबावातून "लाइफलाइन' ची तांत्रिक क्षमता न तपासताच "जम्बो'चे काम देण्यात आल्याची कबुली विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती. "लाइफलाइन'च्या कामाची कल्पना असलेल्या काही अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत निर्णय घेऊन काही प्रमाणात आगाऊ रक्कमही दिली होती. "जम्बो'तील उपचार व्यवस्था सुधारल्याने तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्ण वाढण्याच्या शक्‍यतेने महापालिकेचे हॉस्पिटल आणि "जम्बो'तील आयसीयू व ऑक्‍सिजन बेड कायम ठेवण्याची सूचना केंद्रीय पथकाने केली आहे. त्यामुळे या दोन्ही व्यवस्थांत पुरेसे बेड हवेत. 
-डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

पुण्यातील "जम्बो'त सहाशे बेडच्या कामाचा आदेश मिळाला आहे. मात्र, सेंटरच्या मूळ क्षमतेनुसार डॉक्‍टर, परिचारिका उपलब्ध केल्या आहेत. 
-डॉ. श्रेयांस कपाले, अधिष्ठाता, "जम्बो' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred beds missing from Jumbo Covid Care Center