पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर विचित्र अपघातात 2 ठार; वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

खोपोली महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वेवर किलोमीटर क्र.३६ खालापूर टोलनाक्याजवळ तीव्र उतारावर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन मोटारींना धडक दिली. तिन्ही वाहने द्रुतगती मार्गाच्या लोखंडी संरक्षक कठड्यास धडकत मार्गावर उलटली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तीन जण जखमी आहेत. ​

लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज (सोमवारी) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

खोपोली महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वेवर किलोमीटर क्र.३६ खालापूर टोलनाक्याजवळ तीव्र उतारावर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन मोटारींना धडक दिली. तिन्ही वाहने द्रुतगती मार्गाच्या लोखंडी संरक्षक कठड्यास धडकत मार्गावर उलटली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तीन जण जखमी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस मदत केंद्र, आयआरबी कंपनीचे देवदूत पथक, खोपोलीतील स्वयंसेवी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. जखमींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची ओळख पटविन्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in Accident On Pune Mumbai Expressway near Khalapur toll plaza