पुण्यात श्वानप्रेमी महिलेस दोन महिलांकडून जबर मारहाण | Fight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fight

पुण्यात श्वानप्रेमी महिलेस दोन महिलांकडून जबर मारहाण

पुणे : रस्त्यावरील भटक्‍या श्वानांना खाद्य देणाऱ्या एका श्वानप्रेमी महिलेस दोन महिलांनी जबर मारहाण केली. हि घटना चंदननगर परिसरात घडली असून याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्वानप्रेमी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व मारहाण करणाऱ्यांपैकी एक महिला फिर्यादीची बहीण आहे. श्वानप्रेमी महिला संशयित आरोपी महिला या एकाच परिसरात राहतात. श्वानप्रेमी महिलेच्या घरी श्वान आहे, त्याचबरोबर त्या रस्त्यावरील भटक्‍या श्वानांनाही खायला देतात. त्या श्‍वानांना खायला देत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होते, असा आरोप करून दोघींनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारानंतर त्यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलांनी श्वानप्रेमी महिलेविरुद्ध परस्परविरोधी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top