Women's Day : ‘मिशन आद्या’अंतर्गत होणार दोन लाख ‘सॅनिटरी’चे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

राज्यात केवळ १७  टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याची माहिती एका अभ्यासानुसार पुढे आली आहे. बाकीच्या स्त्रिया अन्य घातक मार्ग वापरून अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ही सामाजिक समस्या ओळखून ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’च्या वतीने जागतिक महिला दिनापासून राज्यातील गरजू महिलांना दोन लाख सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात करण्यात येणार आहे.

पुणे - चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने जागतिक महिला दिनापासून ‘मिशन आद्या’अंतर्गत गरजू महिलांना दोन लाख सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात केवळ १७  टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याची माहिती एका अभ्यासानुसार पुढे आली आहे. बाकीच्या स्त्रिया अन्य घातक मार्ग वापरून अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ही सामाजिक समस्या ओळखून ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’च्या वतीने जागतिक महिला दिनापासून राज्यातील गरजू महिलांना दोन लाख सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात करण्यात येणार आहे. ‘मिशन आद्या’अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी’ याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

याबाबत ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’चे अध्यक्ष किशोरकुमार शहा म्हणाले, ‘‘मासिक पाळीबद्दल देशातील महिलांमध्ये अजूनही पारंपरिक गैरसमजुती आहेत. ही सामाजिक समस्या ओळखून हा उपक्रम राबविण्यात येणात आहे. ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’च्या वतीने आत्तापर्यंत विविध सामाजिक कार्यांत सहभाग नोंदविला आहे.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two lakh sanitary napkin distribute by mission aadya